म. गांधी : शाश्वताचा यात्रिक
आपल्या अंतरंगाला कायम शाश्वताची ओढ असते. व्यक्तिमत्त्वाचे पोषण शाश्वत विचारांनीच होते. गांधी ती भूक भागवितात. कारण गांधीजींनी शाश्वताशी असलेले नाते कधीच तुटू दिले नाही. शाश्वताशी असलेले हे नाते गूढ नव्हते, तर प्रयोगशील आणि बुद्धिनिष्ठ होते. जीवनाच्या मूलभूत तत्त्वांवरची त्यांची श्रद्धा ही प्रयोगनिष्ठ होती. प्रयोगातून मिळणारा आत्मविश्वास त्यांच्या लहानसहान कृतीतून आणि वक्तव्यातून सहजी प्रकट होत असे.......